ABOUT US

विनाअनुदानीत तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचान्यांना समजामध्ये सन्मानाने जगता यावे, हया तंत्रशिक्षण संस्थांची दर्जात्मक व गुणात्मक वाढ व्हावी व काही ठिकाणी विद्यार्थी- पालकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन त्यांची होणारी लूट थांबावी ह्या करता टिचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्नीक्स (टॅफनॅप) ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. टिचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ही संघटना संपुर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी एकमात्र नोंदणीकृत संघटना आहे. विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील अनेक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टॅफनॅपने आजपर्यंत आंदोलन, निदर्शने व न्यायालयीन मार्गाने सातत्याने लढा दिलेला आहे.

अल्पावधितच संगमनेर, अहमदनगर, चांदवड, फैजपुर, धुळे, जळगाव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, मालेगाव, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती, सोलापूर, साखराळे, इचलकरंजी व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कधी सामोपचाराने, कधी शांततापूर्ण आंदोलनाच्या मार्गाने तर कधी न्यायालयीन लढा देऊन टॅफनॅपने विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये स्पृहणीय यश मिळवले आहे. अत्यंत निस्पृहवृत्तीने झोकून देऊन काम करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीमुळे आज टॅफनॅपचे कार्यक्षेत्र कोल्हापूर • विभाग, उत्तर महाराष्ट्र विभाग, विदर्भ विभाग व मुंबई विभाग अशा चार विभागांमधून सुरु आहे.

महाराष्ट्रातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांना टॅफनॅप हा आज एक फार मोठा आधार वाटत आहे. तंत्रशिक्षण खात्यामध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांना देखील टॅफनॅपने सर्व स्तरावर विरोध केलेला आहे. माजी तंत्रशिक्षण संचालक श्री. न.बा. पासलकर यांना दिलेला आदर्श शिक्षक पुरस्कार, सेकंड शिफ्ट पॉलिटेक्नीक्सना मंजुरी देत असताना झालेले नियमांचे उल्लंघन या सारख्या समाजहितविरोधी धोरणांविरुध्द टॅफर्नेपने जनहित याचिकेद्वारे दाद मागितली आहे. तंत्रशिक्षण खात्याच्या चांगल्या योजनाना टॅफनॅपने नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. विनाअनुदानित तंत्रनिकेतनांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश हे केंद्रिभूत पध्दतीने व्हावेत ह्या करीता टॅफनॅपने सातत्याने तीन वर्षे लढा दिला आणि त्यामुळेच सन २०१०-२०११ ह्या शैक्षणिक वर्षापासून हे प्रवेश केंद्रिभूत पध्दतीने करण्याचा शासनाला निर्णय घ्यावा लागला. ह्या एका निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांची संस्थाचालकांकडून होणारी अडवणूक व पिळवणूक याला फार मोठ्या प्रमाणात आळा बसला.

आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महावि‌द्यालये, डी फार्म व बी. फार्म महाविद्यालये, व्यवस्थापन महाविद्यालयातील

कर्मचान्यांकरीत टॅफनॅप हे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा देश पातळीवर महासंघ स्थापण्यासाठी टॅफनॅप कार्यरत आहे. आपणा सर्वाच्या सक्रिय सहभागाची त्यासाठी आवश्यकता आहे.